Saturday, 14 September 2013

रामदास

रामदासाला छत्रपति शिवरायांचा 'गुरु' म्हणून थापन्याचा प्रयत्न रामदासी सातत्याने करित आहेत.काय तर म्हणे.....! रामदासाने छत्रपति शिवरायांना 'स्वराज्य' स्थापन्यासाठी प्रेरणा दिली.खरे तर.....! प्रेरणा-आशिर्वाद तर सोडाच पण, या रामदासाची आणि छत्रपति शिवरायांची कधी ही भेट सुध्दा झालेली नाही.रामदास हा छत्रपति शिवरायांचा 'गुरु' तर नाहीच.नाही.पण हा रामदास विजापुरच्या आदिलशहाचा व औरंगजेबाचा 'हेर' मात्र नक्कीआहे.तसेच रामदासाने 'रामदासी पंथ' ही आदिलशाहितच स्थापन केला होता.त्या बाबत आनंद घोरपडे लिहितात,"शिवाजिराजांच्या राज्य स्थापनेचा प्रारंभ १६४५ च्या सुमारास झाला हे वर आलेच आहे.त्यांची राजमुद्रा असलेले पहिले निर्णायक पत्र १६४६ चे (१५-पृ.१९) या रामदासी पंथाची स्थापना १६४९ ची (१५-पृ.३१) हा कालानुक्रम पाह्ताही शिवाजीची राज्यनिर्मितिची प्रेरणा समर्थंची नव्हेच.हा रामदासी पंथही त्यांनी आदिलशाहित स्थापला जेथे राजांचा कोणत्याही प्रकारचा अधिकार व संबंध पोहोचत नव्हता,व चाफळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजिराजांचे शत्रु होते.विजापूर पातशाहिचे दोन बडे अंमलदार मुरार जगदेव आणि बाजी घोरपडे यांनीच रामदासांच्या नव्या देवस्थानाला काही स्वत:च्या जमिनी व काही विजापूर दरबारा मार्फत इनाम दिल्याचा उल्लेख आहे.(२०-पृ.३७) रामदासाचे ठोसर घराणे मुधोळच्या घोरपडे घराण्याचे आश्रित होते." (संदर्भ:-शिवछत्रपति समज : अपसमज,लेखक-आनंद घोरपडे.पान.नं.५८)

No comments:

Post a Comment